एक पेड माँ के नाम या उपक्रमांअतर्गत महात्मा गांधी विद्यालयातील मुलींनी दिंडी सोहळ्यातून दिला संदेश..

परंडा(तानाजी घोडके) शहरातील महात्मा गांधी विद्यालय परंडा येथे आषाढी एकादशी निमित्त पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी दिंडी काढून त्यामध्ये विठुरायाचा जप केला. मुलींनी गोल रिंगण , फुगडी खेळून पंढरीच्या वारीची फेरी काढली.
एक पेड माँ के नाम या शासनाच्या उपक्रमा मध्ये भाग घेऊन विद्यार्थ्यांनी झाडांचे महत्त्व फेरी काढून समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या वेळी ग्रंथांचे महत्त्व काय आहे हे ग्रंथ दिंडीने या विद्यार्थ्यांनी विविध फलक दाखवून समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ही संकल्पना महात्मा गांधी विद्यालयातील चित्रकलेच्या शिक्षिका बागडे मॅडम यांनी राबवली,त्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी साथ देऊन कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा केला उपक्रमात सर्व सहभागी विद्यार्थी शिक्षक यांचे मुख्याध्यापक रंजीत घाडगे , पर्यवेक्षक बाळासाहेब काशीद यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

error: Content is protected !!