परंडा न.प. सीओ मनीषा वडेपल्ली यांची मुरूम येथे नियुक्ती.


परंडा (प्रतिनिधी) परंडा नगर परिषदच्या मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली यांची धाराशिव जिल्ह्यातीलच मुरुम येथे मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत दि. `४ रोजी आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या तात्पुरत्या नियुक्त्या नगर विकास विभागाने केल्या आहेत.
मुख्याधिकारी वडेपल्ली यांची बदली करण्यात यावी किंवा त्यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून असलेली नियुक्ती रद्द करून निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवावे, अशी मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अड. नुरुद्दीन चौधरी, माजी उपनगराध्यक्ष इस्माईल कुरेशी, समीर पठाण, रहिमतुल्ला पठाण आदींनी हलगी बजओ आंदोलन केले होते. विरोधी पक्षांची ही अनेक महिन्यांपासून मुख्याधिकारी यांची बदली करण्यात यावी

अशी मागणी होती. आगामी सार्वत्रिक निवडणुका मुक्त निःपक्षपातीपणे व पारदर्शकपणे पार पाडण्याकरिता तसेच निवडणूक प्रक्रिया कर्तव्यपक्ष व निःपक्षपाती अधिकारी, कर्मचारी यांच्याद्वारे हाताळण्याकरिता उपाययोजना करण्याच्या दृष्टीने संदर्भाधिन पत्रान्वये राज्य निवडणूक आयोगाने बदलीबाबत निर्देशित केले आहे. त्यानुसार सीओ वडपल्ले यांची तात्पुरत्या स्वरुपात बदली करण्यात आली आहे.

error: Content is protected !!