अ.भा.मराठी साहित्य परिषदेच्या १९ व्या महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन पुणे येथे अमित भांडे यांची स्त्री शक्तीचा जागर करणारी ‘तूच जिजाऊ, तूच सावित्री’ कविता सन्मानित…

पुणे(प्रतिनिधी) दिवसेंदिवस वाढत चाललेल्या स्त्रियांवरील अत्याचारा विरोधात नरसंहार करण्यासाठी तमाम स्त्री शक्तीला तिच्यात संचारत असेलल्या आदी शक्तीची जाणीव करून देण्यासाठी काल दि २३ नोव्हेंबर रोजी उस्फूर्त प्रतिसादात पार पडलेल्या १९ व्या महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन महात्मा जोतिबा फुले सांस्कृतिक भवन वानवडी, पुणे येथे मुळचे अंजनगाव सुर्जी, अमरावती येथील वैदर्भीय कवी अमित भांडे यांनी त्यांच्या खास शैलीत ‘तूच जिजाऊ, तूच सावित्री’ हि कविता सादर केली असता त्यांचे सादरीकरण श्रोत्यांच्या टाळ्यांचा कडकडाट घेणारे ठरले, तसेच त्यांना त्यांच्या उत्कृष्ट कविता सादरीकरणासाठी सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, त्यासाठी त्यांचे सर्व स्तरातून तसेच मित्र परिवाराकडून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. या संमेलनाला राज्यभरातून मोठ्या संख्येने कवी साहित्यिक हजर होते, संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक किशोर टिळेकर, सुर्यकांत नामगुडे, स्वागताध्यक्ष विजया गायकवाड तसेच उद्घाटक म्हणून डॉ. संजय चोरडिया व विशेष अतिथी म्हणून अ.भा.मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे हे लाभले होते.

error: Content is protected !!