पुणे(प्रतिनिधी) महात्मा जोतिबा फुले सांस्कृतिक भवन वानवडी, पुणे येथे नुकत्याच काल दि ६ रोजी उस्फूर्त प्रतिसादात पार पडलेल्या १७ व्या छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात राज्यभरातून मोठ्या संख्येने कवी साहित्यिक हजर होते, संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक संतोष नारायणकर,निमंत्रक किशोर टिळेकर, सुर्यकांत नामगुडे, स्वागताध्यक्ष विजया गायकवाड तसेच तसेच उद्घाटक म्हणून डॉ. शरद गोरे हे लाभले होते, या प्रसंगी आयोजित कविसंमेलनात पेशाने संगणक अभियंता असलेले वैदर्भीय कवी अमित भांडे यांनी आपल्या खास शैलीतून सध्याच्या भ्रष्ट व मलिन झालेल्या परिस्थितीवर भाष्य करणारी ‘स्वराज्य धोक्यात आहे’ या कवितेतून पोटतिडकीने शेतकऱ्यांची व्यथा तसेच स्त्रियांवरील वाढते अत्याचार व गडकिल्ल्यांची होणारी अवहेलना मांडून शिवरायांना आपल्या कवितेतून साद घालत या भ्रष्ट व्यवस्थेची तक्रार केली, त्यांचे सादरीकरण सर्व उपस्थितांना भावूक करून टाळ्यांचा कडकडाट घेणारे ठरले, तसेच त्यांना त्यांच्या उत्कृष्ट कविता सादरीकरणासाठी सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व शाल प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, त्यासाठी त्यांचे सर्व स्तरातून तसेच मित्र परिवाराकडून अभिनंदन तसेच कौतुक करण्यात येत आहे.
- Home
- ब्रेकिंग न्यूज
- अमित भांडे यांची ‘स्वराज्य धोक्यात आहे’ कविता अ.भा.मराठी साहित्य परिषदेच्या १७ व्या छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन पुणे येथे सन्मानित…