पुणे(माझं गांव माझं शहर) महात्मा जोतिबा फुले सांस्कृतिक भवन वानवडी, पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या चौथ्या राज्यस्तरीय राजकुमार काळभोर साहित्य संमेलनात राज्यभरातून १०० हून अधिक कवी साहित्यिक हजर होते, संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक सुर्यकांत जी नामगुडे तसेच उद्घाटक म्हणून कवी किशोर टिकेकर यांनी भूषविले तर स्वागताध्यक्ष पदी पै. राहूल काळभोर महाराष्ट्र केसरी हे लाभले होते तथा संमेलनाचे आयोजक तथा निमंत्रक म्हणून अ.भा.मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे व विशेष अतिथी म्हणून श्रीमंत युवराज संभाजीराजे भोसले हे उपस्थित होते, या प्रसंगी आयोजित कविसंमेलनात पेशाने संगणक अभियंता असलेले वैदर्भीय कवी अमित भांडे यांनी आपल्या खास वर्हाडी शैलीत शेतकऱ्याची व्यथा मांडणारी ‘भाकर बेसन’ कविता सादर केली असता, सर्व उपस्थितांना भावूक करून टाळ्यांचा कडकडाट घेणारी ठरली, तसेच त्यांना सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणासाठी सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले, त्यासाठी त्यांचे सर्व स्तरातून तसेच मित्र परिवाराकडून अभिनंदन तसेच कौतुक करण्यात येत आहे.
- Home
- State News
- अ.भा.मराठी साहित्य परिषदेच्या ४ थ्या साहित्य संमेलनात अमित भांडे यांची शेतकऱ्याची व्यथा मांडणारी भाकर बेसन कविता सन्मानित