अनाळा (प्रतिनिधी)एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प परंडा अतिरिक्त पदभार अनाळा येथे किशोरवयीन मुली व महिला जेंडर आरोग्य कुटुंब नियोजन प्रशिक्षण दि . ०९ रोजी घेण्यात आले. या प्रशिक्षणाला आसू विभागाच्या अंगणवाडी पर्येंवेक्षिका जे. ए .मोमीन यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित किशोरी मुली व महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अनाळा चे वैद्यकिय अधिकारी डॉ . शिवराज दत्ताराम बामणे उपस्थिते . यावेळी त्यांनी आहार ,पोषण ,आरोग्य स्वच्छता तसेच कुटुंब नियोजन विषयक मार्गदर्शन केले. ॲड . निरंजन कोकणे यानी महिलांच्या कायदेविषयक व पोक्सो कायदेविषयक मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी न्यू हायस्कुल च्या शिक्षिका ख़ुशी अलीम शेख , श्रद्धा बारबोले व किशोरी मुली उपस्थित होत्या. जि . प. शाळेच्या जे.एस. लोकरे , एम . ए . राऊत , एस जी सोनटक्के , एम. एम . नकाते मॅडम उपस्थित होत्या.तसेच हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका शेख एच .एस ., जाधव एस . एस ., मोरे व्ही .एस ., मदतनीस व्ही . एस .चौगुले, लोहार एस . एम, बावकर बी .ए . यांनी अथक परिश्रम घेतले .