परंडा २५ (प्रतिनिधी ) युवा ग्राम विकास मंडळ (युवा ग्राम), व महिला बाल विकास कार्यालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने “बालहक्क व बाल सुरक्षिता ” या राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत शुक्रवार ता.२५ रोजी येथील पंचायत समिती सभागृहात एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेचे उद्घाटन धाराशिव महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवा ग्राम विकास मंडळ कार्यकारी सचिव एच.पी.देशमुख गट विकास अधिकारी रावसाहेब चकोर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आमोल कोवे,चाईल्ड हेल्पलाईन समन्वयक विकास चव्हाण, जिल्हा बाल संरक्षण कक्ष समुपदेशक प्रज्ञा बनसोडे, सामाजिक संस्था प्रतिनिधी श्री घोडके आदि उपस्थित होते.
या कार्यशाळेत बालकांचे मूलभूत हक्क, बालसुरक्षा, पोक्सो कायदा, जे जे कायदा, बालविवाह प्रतिबंधक उपाय, व “बालसुरक्षित ग्रामपंचायत” या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शकांनी सखोल माहिती दिली.बालविकास आधिकारी किशोर गोरे यांनी बालविवाह प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कशी करावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.विकास चव्हाण यांनी चाईल्ड हेल्पलाईन १०९८ चा वापर, प्रक्रिया आणि महत्त्व समजावून सांगितले.
प्रज्ञा बनसोडे यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि बालविवाह यावर कायदेशीर बाजूंची उजळणी केली.गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर यांनी पंचायत समिती अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती यावेळी दिली.या कार्यशाळेसाठी ग्रामसेवक,विविध विभागातील कर्मचारी यांची उपस्थिती होती.कार्यशाळेसाठी संतोष रेपे, प्रकाश काळे, शहाजी ढोरे, सारिका अंधारे व अनुराधा अंबुरे यांनी पुढाकार घेतला.