बावची येथील विद्यार्थी, शेतकरी यांचा गुडघाभर पाण्यातून जिवघेणा प्रवास.

परंडा(माझं गांव माझं शहर) बावची ता परंडा येथील पालखी मार्गावर खासापुरी बावची ते सरपणे,टोंणपे, शिवतारे,सायकर वस्ती वर जाण्यासाठी मुख्य रस्त्यावरील ओढ्यातून व ५०% शेतवस्ती व शेतीसाठी असलेल्या रस्त्यावर शेतकरी विद्यार्थी यांना घुडखाभर ते मांडी यवढ्या पाण्यातून जिवघेणा प्रवास करावा लागत आहे.शालेय विद्यार्थी वाहून जाण्याची भिती पालकांना वाटते म्हणून बरेच विद्यार्थी शाळेत पाठवत नाहीत.तसेच शेतकऱ्यांना शेत माल वाहतूक करण्यासाठी खुप आड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करून विद्यार्थी, शेतकरी यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावा.आशी समस्त गावकरी मंडळी यांची मागणी आहे.

error: Content is protected !!