परंडा( दि.५) येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथे कनिष्ठ विज्ञान विभागाचा भव्य पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. मुलांच्या भवितव्याबाबत एक पाऊल पुढे या महाविद्यालयाच्या पुढाकारातून हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे अध्यक्ष सुनील नाना शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा डॉ सचिन चव्हाण मराठी विभागप्रमुख डॉ गजेंद्र रंदील सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्म शिंदे पालक मेळाव्याच्या चेअरमन सो परवीण मोरवे वाणिज्य विभागाचे प्रा डॉ सचिन साबळे आदी उपस्थित होते यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पालक मेळाव्यासाठी परंडा शहर व तालुक्यातून एकूण १५८ पालकांची उपस्थिती होती .कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा संतोष भिसे यांनी केले. यावेळी पालक मेळावा समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये बालाजी हरी सल्ले सुधीर रावसाहेब नाईकवाडी नजीम शेख सुकेशनी संभाजी सातपुते अर्चना अंगद हेळकर यांची या समितीच्या सदस्य पदी सर्वांमध्ये नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी प्रा डॉ शहाजी चंदनशिवे दत्तात्रय गोळे मानसी रजपूत यांनी आपले मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विजय जाधव यांनी केले तर प्रा किरण देशमुख यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयाचा झालेला विकास पीपीटी द्वारे दाखवण्यात आला. सर्व पालकांनी महाविद्यालयातील विविध विभागांना भेटी दिल्या व आपल्या सकारात्मक भावना व्यक्त करत आनंद व्यक्त केला .यावेळी सर्व पालकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तालुका समितीमध्ये नियुक्त झालेल्या सदस्यांचा संस्थेचे अध्यक्ष सुनील नाना शिंदे व प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या हस्ते पुष्प बुके देऊन सत्कार करण्यात आला.