परंडा (प्रतिनिधी): श्रीराम नवमी निमित्त परंडा येथील नवीन श्रीराम मंदिरात भक्तिमय वातावरणात कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी समर्थ भक्त श्रीराम बुवा जोशी (केज) यांनी आपल्या प्रभावी वाणीतून उपस्थित भाविकांना श्रीराम भक्तीचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम चरित मानस प्रेमी मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते. कीर्तनादरम्यान श्रीरामांच्या जीवनातील विविध प्रसंग, आदर्श आणि धर्माचे महत्त्व यावर भाष्य करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.
या कार्यक्रमाला परिसरातील मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती दर्शवून श्रीराम नामाचा गजर केला. मंदिर परिसर भक्तीमय वातावरणाने दुमदुमून गेला. आयोजकांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.