परंडा,ता.२९ (प्रतिनिधी ) कल्याणसागर समुहातील येथील कल्याणसागर माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी वर्षा नागनाथ थोरात हिची धाराशिव पोलीसपदी तर विशाल नागनाथ थोरात याची पुणे शहर पोलीस पदी निवड झाल्याबद्दल या भावंडाचा भाजपा मा. आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन मुलगा व मुलीला पोलीस विभागात भरती केल्याने पालक माजी सरपंच नागनाथ थोरात रा.पिंपरखेड ता.परंडा यांचाही ठाकूर यांनी सन्मान केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द,चिकाटीने यश संपादन केल्याबद्दल दोन्ही विद्यार्थ्यांचे व पालकांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कल्याण सागर समूहाचे मार्गदर्शक विकास कुलकर्णी, मुख्याध्यापक सुबोधसिंह ठाकुर, मुख्याध्यापक किरण गरड, चंद्रकांत पवार, शिक्षक अंगद लांडगे, चंद्रकांत तनपुरे, भारत थिटे आदी उपस्थित होते.