परंडा सेवा मंडळाच्या वतीने जि.प.शाळेतील इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

Img 20250726 wa0043


परंडा,ता.२६ (माझं गांव माझं शहर) जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या गरीब,होतकरु मुलामुलींमध्ये गुणवत्ता आहे. भविष्यात विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या क्षेञात उच्च करिअर करण्यासाठी पाठबळ देण्याची गरज आहे.प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन शालेय मुलामुलीनी उच्चशिक्षित होण्यासाठी कठोर परिश्रम घेऊन यश संपादन करावे असे मत जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी सेवानिवृत्त प्रा.डॉ. लक्ष्मण सांगळे (छ.सभांजीनगर) यांनी व्यक्त केले.
    परंडा सेवामंडळाच्यावतीने येथील जिल्हा परिषद प्रशाला व जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथील दहावीतील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकासह एकुण सात गरीब होतकरु कुंटुबातील गुणवंत विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य,प्रमाणपञ,रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. प्रा.डॉ.सांगळे यांनी गणित,मराठी,इंग्रजी या विषयात असलेले रंजक उदाहरणे,काव्यगायन करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परंडा सेवामंडळाचे सचिव डॉ.आनंद पाटील (छ.संभाजीनगर) यांनी केले.या कार्यक्रमात जि.प.शाळेतील माजी विद्यार्थी अभियंता जयंत पाटील(मुंबई)  मिलिंद पाटील,अभियंता नंदकिशोर देशमुख यांनी मुलांना तत्कालिन जिल्हा परिषद शाळेतील बालपणीचा अनुभव कथन करीत शाळेतील आठवणींना उजाळा दिला.विद्यार्थ्यांना करियर संदर्भात मार्गदर्शन केले.सुञसंचलन शिक्षक भाऊसाहेब सुर्यवंशी यांनी केले. या कार्यक्रमासाठी जेष्ठ विचारवंत मधुकर लोखंडे,सेवानिवृत्त शिक्षक सुब्राव सांगळे,सुरेश सद्दीवाल,खाजाभाई लुकडे,आनंद देशमुख,रामराव सांगळे,विशाल काशीद,गोरख देशमाने, मुख्याध्यापक रामचंद्र इंगळे,मुख्याध्यापक दिनकर पवार, तानाजी मिसाळ,नामदेव पखाले, नारायण शिंदे, शशिकांत माने,शुभांगी देशमुख,बाबुधी घाडगे, नामदेव पखाले,सतीश खरात, गीतांजली मंडलीक,रेखा उसराटे,आप्पासाहेब बल्लाळ आदिसह पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!