मुंबई(प्रतिनिधी) रशियाकडून जर भारताने कच्चे तेल घेणे बंद केले नाही तर अमेरिका 100 टक्के टेरिफ लादणार असल्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. जर भारताने ही धमकी गांभिर्याने घेतली व रशियाकडून तेल आयात करणे थांबविले किंवा सर्व जगानेच रशियाकडून तेल आयात थांबविली तर पेट्रोल, डिझेलचे दर 8 ते 10 रुपयांनी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी देखील याबाबत भीती व्यक्त केली आहे.
🔸 अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला स्पष्ट धमकी दिली आहे की, 50 दिवसांच्या आत रशियाने युक्रेनसोबतचे युद्ध संपवले नाही तर रशियावर आणि रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर 100% टॅरिफ लावले जाईल. ही अप्रत्यक्ष धमकी भारत, चीन आणि ब्राझीलसारख्या देशांसाठी आहे, जे रशियाकडून मोठ्या प्रमाणात स्वस्त कच्चे तेल विकत घेत आहेत. भारत सध्या आपल्या गरजेच्या 35-40% कच्च्या तेलासाठी रशियावर अवलंबून आहे. पुरवठा कमी झाला, तर जागतिक बाजारात क्रूड ऑईलच्या किंमती वाढतील आणि त्यामुळे भारतामध्ये पेट्रोल-डिझेल 8-10 रुपये प्रति लिटर महाग होऊ शकते.
🔸 केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केले की, रशिया जगातील एकूण तेल पुरवठ्याच्या सुमारे 10% पुरवठा करतो. हा पुरवठा बाजारातून कमी झाला, तर उरलेल्या 90% उत्पादनातून संपूर्ण जगाला तेल खरेदी करावे लागेल, ज्यामुळे किंमतींमध्ये प्रचंड वाढ होईल. भारत आणि चीन हे रशियाकडून कच्च्या तेलाचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत. भारत आपल्या एकूण तेलाच्या गरजेपैकी 88% तेल आयात करतो, त्यातील 38% वाटा रशियाचा आहे. जर अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे रशियाचे 10% उत्पादन जागतिक बाजारातून कमी झाले, तर क्रूड ऑईलच्या किंमती 130-140 डॉलर प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकतात. याचा थेट परिणाम भारतातील इंधन दरांवर होईल.
https://myvillagemycitynews.in
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ई पेपर माध्यमातून तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी संपर्क 👉 8308118788