धाराशिव(जुलै २०२५) जिल्हा परिषद धाराशिव, शिक्षण विभाग आणि ओपन लिंक्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारा आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अर्थात विनोबा(बा) ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील शासकीय व जिल्हा परिषद शाळेत कार्यरत उपक्रमशील शिक्षकांना प्रत्येक महिन्यात प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
जून २०२५ या महिन्यातील पुरस्कार जिल्ह्यातील १२ शिक्षकांना जिल्हास्तरावरील ‘पोस्ट ऑफ द मंथ’ पुरस्कार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मैनाक घोष यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री सूर्यकांत भुजबळ, जिल्हा शिक्षणाधिकारी माननीय श्री नागेश मापारी यांची उपस्थिती होते. यावेळी श्री भाऊसाहेब सुर्यवंशी श्री. नितीन राजपूत, श्री. माधव पोटरे, श्री विनोद कांबळे, श्री. अशोक बनसोडे, वनिता कोकाटे, सुधानवी कडगंचे, श्री. महेश कडगंचे, विद्या वैद्य, संगीता शिंदे, शेख मुलायम, कुदळे मॅडम, श्री. संजय धोंगडे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच दोन शिक्षकांना लायब्ररी बॅग प्रदान करण्यात आल्या.
यावेळी मा. श्री. मैनाक घोष (मुख्य कार्यकारी अधिकारी) यांनी शिक्षकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते बाबत चर्चा केली व शिक्षकांना मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्रमाला पुरस्कार विजेते शिक्षक तसेच ओपन लिंक्स फाऊंडेशन चे प्रकल्प व्यवस्थापक श्री. मनोज गोरासे व प्रकल्प अधिकारी सोमनाथ स्वामी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सर्व शिक्षकांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना प्रेरणा द्यावी अशा प्रकारे अपेक्षा व्यक्त करण्यात आली.