सामाजिक कार्यकर्ते कानिफनाथ सरपणे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा.

परंडा(प्रतिनिधी) परंडा तालुक्यातील बावची ता. परंडा येथील ग्रामपंचायत सदस्य,व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ परंडा तालुका अध्यक्ष तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघ परंडा तालुका अध्यक्ष श्री. कानिफनाथ सरपणे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
निसर्गाचे समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करून व जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळा बावची व जि. प. शाळा गवारे वस्ती बावची येथील विद्यार्थ्यासोबत खाऊ व शालेय साहित्य वाटप करून साजरा करण्यात आला. यावेळी पत्रकार पांडुरंग शिवतारे सह जि. प. शाळेतील शिक्षक श्री कदम सर, श्री गाढवे सर ,श्री कोल्हे सर ,श्री चांदणे सर, श्री आदलिंगे सर व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!