परंडा दि ९ ( प्रतिनिधी ) तालुक्यातील सोनारी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाची व शिपाईची नेमणुक करावी. अशी मागणी मागील एक व दोन वर्षापासून पालक विद्यार्थी याच्या कडुन लेखी व तोंडी .जिल्हा परिषदेच्या वरिष्ट अधिकाऱी यांच्याकडे करुन देखील त्यांनी या दुर्लक्ष केल्यामुळे बुधवारी दिनांक ८ जुलै रोजी ग्रामस्थांनी व पालकांनी शाळेला टाळे टोकुन शाळा बंद केली .
या शाळेत शिकणाऱ्या ९वी व १०वी च्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत, पात्रता धारक शिक्षक नाहीत या सर्व गोष्टींना जिल्हा परिषदेचे अधिकारी जबाबदार आहेत असा सवाल पालकानी उपस्थित केला आहे
तसेच या शाळेत शिपाई नसलेल्या मुळे संपूर्ण शाळेची स्वच्छता करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे त्याच बरोबर तालुक्यातील बरेच शाळेत शिक्षकाची पदे रिक्त आहेत. तेव्हा वरिष्ठ अधिकारी त्वरित लक्ष देवुन विध्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.