परंडा(प्रतिनिधी):- परंडा येथील कल्याणसागर अर्बन को-ॲापरेटिव्ह बॅंकेच्या चेअरमनपदी डॅा. श्री. मंदार वसंतराव पंडित तर व्हाईस चेअरमनपदी श्री. राजेंद्र मोहन चौधरी यांची निवडणूक निर्णय अधिकारी श्री. बी. एच. सावतर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अविरोध निवड करण्यात आली. कल्याणसागर अर्बन को-ॲापरेटिव्ह बॅंकेच्या नवनिर्वाचित संचालकांच्या बुधवार दि. ९ जुलै रोजी झालेल्या बैठकीत ही निवड झाली. या निवडी नंतर कल्याणसागर समुहाचे व बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष मा. आ. श्री. सुजितसिंह ठाकूर यांनी नवनिर्वाचित चेअरमन डॅा. श्री. पंडित मंदार वसंतराव, व्हाईस चेअरमन श्री. चौधरी राजेंद्र मोहन आणि संचालक सर्वश्री. विटकर हनुमंत नागनाथ, काकडे चंद्रकांत नानासाहेब, कळंबकर नुरूद्दीन गुलाम मोहियोद्दीन, काशिद महावीर दिगंबर, देवकर श्रीराम सखाराम, डोंगरे अशपाक अब्दुल सत्तार, शिंदे अप्पासाहेब बापूसाहेब, शहा किरण भागचंद, ॲड. भालचंद्र विठ्ठलराव औसरे, श्रीमती मिस्कीन सरस्वती मनोहर व श्रीमती कुलकर्णी प्रज्ञा रामचंद्र यासर्वांचा फेटा बांधून पुष्पहाराने सत्कार केला. यावेळी कल्याणसागर बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनोजसिंह ठाकूर व बॅंकेचे कर्मचारी उपस्थित होते.