परंडा-मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत तालुक्यात मोठा घोळ.

परंडा (प्रतिनिधी)दि.०८जुलै २०२५:- महाराष्ट्र शासनाच्या वतीने बेरोजगार तरुणांना युवकांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना शासनाने चालू करून नियुक्ती दिल्या यांचा कालावधी सहा महिने होता टप्पा वाढवण्यात आला. परंडा तालुक्यात असे चित्र पाहायला मिळाले की प्रत्येक केंद्रप्रमुखाने स्वतःचे नातेवाईक व कार्यालयीन कर्मचारी यांना नियुक्ती देऊन शासनाची फसवणूक केली आहे. यामध्ये चिंचपूर केंद्र सहाय्यक केंद्रप्रमुख प्रशिक्षणातील श्रीमती मेघना संजय कांडेकर साधन व्यक्ती मनीषा जाधव यांची मुलगी सध्या पुणे येथे रहिवाशी आहे . तांदळवाडी केंद्र सहाय्यक केंद्रप्रमुख प्रशिक्षणातील श्रीमती नेहा आनंद गायकवाड प्रभारी केंद्र प्रमुख आनंद गायकवाड यांची पत्नी आहे केंद्र डोंजा सहाय्यक केंद्रप्रमुख प्रशिक्षणार्थ श्री जगदीश दादासाहेब घोगरे विस्तार अधिकारी बीट तांदळवाडी दादासाहेब घोगरे यांचा मुलगा आहे परंडा केंद्र सहाय्यक केंद्रप्रमुख प्रशिक्षणातील श्रीमती धनश्री उदय ऐतवाडे प्रभारी केंद्रप्रमुख महादेव विटकर यांची जवळची नातेवाईक आहे पिंपळवाडी केंद्र सहाय्यक केंद्रप्रमुख प्रशिक्षणातील श्रीमती विद्या रतन कांबळे गटशिक्षण कार्यालयातील सहाय्यक लेखाधिकारी रतन कांबळे यांची पत्नी आहे त्याचबरोबर शिक्षण विभागाच्या कार्यालयीन लिपिक दीपक बोंडगे यांची पत्नी या पदावर काम करते.
स्थानिक बेरोजगारांना युवकांना शासनाची योजना परंडा तालुक्यात शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या मुलगा मुलगी पत्नी व जवळच्या नातेवाईक यांच्यासाठी राबवली आहे त्यामुळे तालुक्यातील स्थानिक बेरोजगारांना यापासून वंचित ठेवले आहे तरी संबंधित सर्व अधिकारी यांनी घेतलेल्या शासनाच्या बोगस योजना चा लाभ संबंधित व्यक्तीकडून शासनाने वसूल करावा , जे दोषी असतील आशावर कठोर कारवाई करावी अशा मागणीचे पत्र गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना देण्यात आले यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष वर्षद शिंदे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब तरटे , श्रीमंत शेळके आधी सह कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!