स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी परंड्यात मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद

परंडा (प्रतिनिधी) – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने परंडा तालुक्यातील नगरपरिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांसह अधिकृत मतदारांनी गुरुवारी तहसील कार्यालय, परंडा येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.

निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत नगरसेवक, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य तसेच विविध पदांचे इच्छुक उमेदवार यांनी मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदान केले. यावेळी निवडणुकीबाबत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

परंडा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष समरजितसिंह ठाकूर (उबाठा) गटाचे जिल्हाध्यक्ष रणजीत पाटील,भाजपा मंडल अध्यक्ष अरविंद रगडे व नगरसेवक यांनीही तहसील कार्यालयात उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रियेदरम्यान सर्वांनी लोकशाही मूल्ये जपत शांततेत मतदान केले.

निवडणूक प्रशासनाच्या वतीने मतदानासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मतदान केंद्रावर शिस्तबद्ध वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपला प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदारांनी उत्साहाने सहभाग नोंदविल्याचे चित्र पाहायला मिळाले.

error: Content is protected !!