भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांची प्रशांत चेडे यांना सदिच्छा भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

माझं गांव माझं शहर (वाशी) धाराशिव-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच भाजपा नेते तथा माजी आमदार मा. सुजितसिंह ठाकूर यांनी शिवसेना (उबाठा) गटाचे नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत चेडे यांची वाशी येथील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

यावेळी प्रशांत चेडे यांनी मा. सुजितसिंह ठाकूर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. दोन्ही नेत्यांमध्ये विविध सामाजिक, विकासात्मक तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रसंगी दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भेटीचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात असले तरी सध्या सुरू असलेल्या धाराशिव-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. आगामी निवडणुकीत प्रशांत चेडे यांची भूमिका काय राहणार, ते महाविकास आघाडीला सहकार्य करतील की स्वतंत्र भूमिका घेतील, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

स्थानिक राजकारणात महत्त्वाची मानली जात असलेली ही भेट आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

error: Content is protected !!