परंडा(प्रतिनिधी) आषाढी एकादशीनिमित्त कुभेफळ जिल्हा परिषद शाळेत दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला. प्रभारी हेडमास्तर सुतार डी . एम यांच्या मार्गदर्शनाखाली पालक, बालगोपाळांचा टाळ दिंडी सोहळा एकादशीच्या अगोदर साजरा झाला. शाळेकरी मुलांनी संत तुकाराम वेशभूषा चादपांशा इ .3 री संत तुकाराम फरहान इ .6 वी
संत ज्ञानेश्वर वेशभूषा विराज कोटूळे इ 6 वी ज्ञानेश्वर पृथ्वीराज आवाळे , इ. ४ थी स्वाराळी फरतडे संध्या आवाळे यांनी रुक्मिणी वेशभूषा केली त्याच बरोबर भालदार, चोपदार त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा मुला मुलींनी केली होती. अंगणवाडी ते सातवी च्या विद्यार्थ्यांनी बाल वारकऱ्यांची भूमिका साकारली होती.
लहान थोर मुले दिंडीत सहभागी होत डोक्यावर तुळसी हातात पताका घेऊन छोट्या मुली, झेंडेकरी, विणेकरी यामुळे सर्व गावकरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली. यावेळी दिंडीची सुरुवात अभंग व विठ्ठलाची आरती करून झाली. पालखीचे पूजन मुख्याध्यापक यांनी केले. बाल वारकऱ्यांची दिंडी जि प्र शाळा ते कोटोळे, ते दर्गा / मदिरा पूडे गाववाल्या भागातून काढली गावातील नागरिकांच्या वतीने लहान मुलांना नाश्ता देण्यात आला दिंडी यशस्वीतेसाठी प्रभारी हेडमास्तर सुतार डी . एम . लोकरे व्ही . डी . पाटील एच . एस . श्रीमती यादव व्ही .च . श्रीमती काळे एस बी . श्रीमती अडसूळ जे . एस शिंदे बी . एस . गावातिल पालक वर्ग व नागरीक सहभाग घेतला.