परंडा(प्रतिनिधी) अवघा रंग एक झाला ,रंगी रंगला श्रीरंग या अभंगाप्रमाणे दि 05 जुलै रोजी जि.प.प्रा.शाळा शेवाळेनगर येथे दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.वारकरी परंपरेचा वेशभूषा करून हातात वैष्णवांची भगवी पताका,टाळ मृदंग घेऊन ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषाच्या वातावरण अगदी भक्तीमय झाले होते.वस्तीवरील लहान थोरापासून बहूसंख्य महिला भगिनींनी दिंडी सोहळ्यात अभंग, भजन,फुगडी याचाआनंद लुटला.दिंडी सोहळ्यात जागोजागी बाल वारकऱ्यांसाठी चहा, नाष्टा, पाणी , बिस्कीट इ.सोय केली होती.शेवटी शाळेच्या मैदानावर सर्व विद्यार्थी व वस्तीवरील पुरूष, महिला सर्वांनी एकत्रीत महाप्रसादाचा लाभ घेतला.दिंडीचे नियोजन मुख्याध्यापक अनिल गिरी , शिक्षीका रुपाली हजारे ,भजनी मंडळी व वस्तीवरील सर्व पालकांनी केले होते.