नसरापूर येथील अमानुष घटनेचा परंड्यात तीव्र निषेध; तहसीलदारांना निवेदन

📰 माझं गाव माझं शहर | परंडा (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील नसरापूर (ता. भोर) येथे चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व निर्घृण हत्येच्या घटनेचे तीव्र पडसाद परंडा तालुक्यात उमटले आहेत. या अमानुष घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी परंडा शहरातील ब्राह्मण समाज महिला तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील नागरिकांनी एकत्र येत तहसीलदारांना निवेदन सादर केले.

पुण्यातील या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, परंडा तालुक्यातील ग्रामस्थांनी आरोपीविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात, सदर प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीस लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. तसेच पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत व आवश्यक संरक्षण देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

यावेळी सौ. राखीताई देशमुख, सौ. ज्योतीताई भातलवंडे, सौ. घोगले, सौ. जोशी यांच्यासह ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष समीर कुलकर्णी व भाजपचे विकास कुलकर्णी यांनी तीव्र शब्दांत भावना व्यक्त केल्या. या निषेध आंदोलनात महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

error: Content is protected !!