परंडा (प्रतिनिधी) आषाढी एकादशी निमित्त डॉ. वेदप्रकाश विद्यामंदिर मध्ये दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला. वारकरी संप्रदायाची टाळ दिंडी ही महाराष्ट्राची आध्यात्मिक ओळख आहे. हा अनमोल ठेवा पुढील पिढीने ही जतन करावा या हेतूने संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील व विद्यामंदिरचे मुख्याध्यापक दिनेश मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पालक बालगोपाळांचा टाळ दिंडी सोहळा एकादशीच्या अगोदर तीन दिवस आधी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता पाचवीतील कृष्णा देवकर याने श्री विठ्ठलाची तर अक्षरा राऊत हिने रुक्मिणीची वेशभूषा तर इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी बाल वारकऱ्यांची भूमिका साकारली. दिंडीत सहभागी होत डोक्यावर तुळशी घेणाऱ्या छोट्या मुली, झेंडेकरी, विणेकरी यामुळे सर्व शाळा भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली. यावेळी दिंडीची सुरुवात अभंग व विठ्ठलाची आरती करून पालखीचे पूजन डॉ. वेदप्रकाश विद्यामंदिरचे मुख्याध्यापक दिनेश मेटकरी यांनी केले. बाल वारकऱ्यांची दिंडी बावची चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोल्डन चौक या मार्गावरून दिंडी मार्गस्थ झाली. दिंडीचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी डी.
सी. गिरवले, बी. आर. हलसे, एस. एन. वाघ, एस. पी. मोराळे, ए.जी. मोराळे, के. डी. मुळीक, सी.पी. नांदवटे, डी. सी. डेंगळे, जे. एस. मदने, एस. व्हि. काकडे, एस. पी. जगताप यांनी परिश्रम घेतले.