माझं गांव माझं शहर (प्रतिनिधी) परंडा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रचाराचा धुरळा उढत आहे गुरुवार दि २९ रोजी लोणी गटातील व लोणी व वडनेर गणातील उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ देवगाव येथील महादेव मंदिरात भाजप नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी परंडा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्यावर जोरदार टीका केली सावंत अवकाळी पावसासारखे मतदारसंघात येतात अन्अवकाळी पाऊस कोणाच्याच फायद्याचा नसतो अवकाळी पावसाचा आपण अनुभव घेतलाय आमदार झाल्यापासून सावंत चारवेळा मतदारसंघात आले अन् बरसून केले अशी आक्रमक टीका ठाकुर यांनी तानाजी सावंत यांच्यावर केली.
यावेळी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार पूजा शिंदे, वडनेर गणातील उमेदवार शैला वेताळ व लोणी गणातील राधा गणगे यांच्यासह आवार पिंपरी चे माजी सरपंच सुरेश डाकवाले गौतम लटके, मुकुल देशमुख बाबासाहेब जाधव, राजाभाऊ चौधरी, भागवत डाकवाले, शंकर इतापे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.