परंडा दि २४ : – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत निष्ठावान शिवसैनिकांना डावलल्याचा राग म्हणून मी अपक्ष पॅनल उभा केले . प्रा . डॉ . तानाजीराव सावंत भोळे आहेत . त्यांनी एकनाथ शिंदे यांचेसोबत बंड केले त्या काळात जे शिवसैनिक आपल्याशी एकनिष्ठ राहिले , पक्षासाठी आपल्यासाठी जिवाच रान केल त्यांना या निवडणूकीत वाऱ्यावर सोडले हे कुणाच्या सांगण्यावरून ? महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अर्चनाताई दराडे असतील , परंडा , भूम – वाशी येथील तुमच्यावर विश्वास ठेऊन एकनिष्ठ राहिले , तुम्हाला , पक्षाला ज्यांनी वाहून घेतले अशा निष्ठावान शिवसैनिकांना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत डावलण्यात आले , आपण पुण्याला निघून गेलात सर्व कार्यकर्ते आणि कारभार मी सांभाळला . सर्व शिवसैनिकांना न्याय द्यायचे काम केले , आणि आमचे कांहीही न ऐकता तुमचे कान भरणारे कुठे ? होते . त्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला . तुम्ही सांभाळलेल्या चांडाळ चौकडी कोल्या कुत्र्यांचे ऐकून निष्ठावान शिवसैनिकांना तुम्ही डावलता ? त्यासाठी आता आमची माघार नाही . असे शिवसेनेतून अपक्ष पॅनल उभा केलेले प्रा . डॉ तानाजीराव सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी माजी मंत्र्याचे बधीर कान चांगलेच टोचले . अन् यासाठीच जिल्हा परिषद व पंचायत समितीला उभा केलेले सर्व उमेदवार व कार्यकर्ता यांचा मेळावा घेऊन चुलते – पुतण्यांच्या वादाचा खुलासा जिल्हा परिषद धाराशिवचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी केला . या आगोदर राजाभाऊ देवकते , धनंजय पाटील , दत्ताभाऊ मोहिते , गौत्तम लटके यांनी आपले विचार व सावंत घराण्यातील फुटीचा खुलासा केला . यावरही माझे चुलते डॉ . तानाजीराव सावंत हा भोळा शंकर आहे पण जे चुकीच्या गोष्टीनी त्यांच्या जवळचे चमचे कान भरतात ते सोडून निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय देत असतील तर मी आता माघार घेतो, अन्यथा ही लढाई आम्ही लढणार अन् जिंकणार आहोत असा ठाम निर्धार धनंजय सावंत यानी या कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केला .