जिल्हा परिषद निवडणूक: सावंत कुटुंबात राजकीय ठिणगी; पुतणे धनंजय सावंत निवडणुकीच्या रिंगणात?

परंडा (माझं गांव माझं शहर)- तालुक्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते मा.मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्यात राजकीय मतभेद,कुटुंबातील कलह समोर आले आहेत . धनंजय सावंत यांनी जिल्हा परिषदेच्या ‘जवळा’ गटातून निवडणूक लढवण्याचे संकेत देत प्रचार सुरू केला आहे. सोशल मीडियावर त्यांचे ‘भावी जिल्हा परिषद सदस्य’ म्हणून पोस्टर्स झळकले आहेत .


तानाजी सावंतांचा इशारा: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यात तानाजी सावंत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे . पक्षाशी प्रतारणा करणाऱ्या किंवा बंडखोरी करणाऱ्यांना त्यांनी जाहीर इशारा दिला असून, “निवडणुकीत गद्दारी केली तर ठेचून काढू,” असे विधान त्यांनी केले आहे .


बंडखोरीची शक्यता: धनंजय सावंत यांनी यापूर्वी लोकसभा निवडणुकीसाठीही इच्छा व्यक्त केली होती, मात्र महायुतीच्या जागावाटपात ती जागा राष्ट्रवादीकडे गेल्याने त्यांना माघार घ्यावी लागली होती. जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी सक्रिय होऊन प्रचार सुरू केल्याने, ते काकांच्या विरोधात किंवा स्वतंत्रपणे उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे .


निवडणुकीचे वातावरण: धाराशिव जिल्ह्यात ५ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे.  तानाजी सावंत यांनी याआधीच निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून, कार्यकर्त्यांना एकजुटीने कामाला लागण्याचे आवाहन केले आहे .
सावंत कुटुंबातील हा अंतर्गत कल धाराशिवच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवू शकतो, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे .
धनंजय सावंत यांचा सुजितसिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश करणार ? याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

पक्षप्रवेशाने काय होणार: आजपर्यंत सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून कामे केली. जनतेला न्याय दिला अशा कार्यकर्त्यांना डावलले जाणार का याकडे सर्वसामान्य जनतेचे व मतदाराचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!