परंडा (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या नवीन शासन निर्णयानुसार प्रत्येक दिव्यांगाना स्वावलंबन पोर्टलवरील यु डी आय डी कार्ड बंधनकारक असल्यामुळे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी करिता दि. २ जानेवारी २०२६ रोजी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय परांडा येथे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी करिता मोठी गर्दी होती. या शिबिरासाठी नेहमी उपस्थित राहून दिव्यांगासाठी कार्य करणारे दिव्यांग उद्योग समूहाचे राज्याध्यक्ष तानाजी घोडके हे नेहमी पाठपुरावा करतात. प्रमाणपत्र बाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करतात . आज परंडा येथे दिव्यांग तपासणी झाली यामध्ये अस्थिव्यंग दिव्यांग ५० मतिमंद दिव्यांग ११ ,अंध दिव्यांग ४ अशा एकूण ६५ दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली.
यासाठी धाराशिव येथून अस्थिव्यंग दिव्यांग तपासणी करिता डॉ.गणेश पाटील, मतिमंद दिव्यांग करिता डॉ.सुहास शिंदे अंध दिव्यांग तपासणी करिता डॉ.पवन महाजन या तज्ञ डॉक्टरांनी कामकाज पाहिले व दिव्यांगाची तपासणी केली. यावेळी भाजपा दिव्यांग आघाडी तालुकाध्यक्ष तानाजी घोडके दिव्यांग उद्योग समूह तालुकाध्यक्ष तानाजी सांगडे, सरकारी दवाखाना एक्स-रे विभाग खताळ, तानाजी गुंजाळ आदी कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.