परंडा दि ३० : – परंडा नगरपरिषदेची निवडणूक चुरशीची आणि अस्मितेची होणार आहे . नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे माजीमंत्री आमदार डॉ .तानाजीराव सावंत यांचे कट्टर समर्थक माजी नगराध्यक्ष जाकिराई सौदागर व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार कै . ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजिव उच्च शिक्षित तरुण जनशक्ती नगरविकास आघाडीचे विश्वजित पाटील यांच्यात लढत होणार आहे . जाकिरभाई सौदागर यांनी नगराध्यक्ष पदाची सत्ता भोगलेली आहे त्यांना दांडगा अनुभव आहे . त्यांनी गल्लीबोळात विकासकामे केल्याचा गवगवा आहे . परंतु माजी आमदार कै . ज्ञानेश्वर पाटील यांच्याही कार्याचा बोलबाला आणि प्रचंड सहानुभूतीची लाट म्हणून त्यांचा सालस वृतीचा मुलगा विश्वजित पाटील यांना वाढता पाठींबा यामुळे नगराध्यक होणार कोण ? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे . विश्वजित पाटील यांना भाजपा , राष्ट्रवादी काँग्रेस , वंजित बहुजन आघाडी , एमआयएम राष्ट्रीय काँग्रेस यांचा पाठींबा आहे तर जाकिरभाई सौदागर यांच्या साठी डॉ तानाजीराव सावंत यांनी सर्वस्वी पणाला लावले असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे .
तसेच प्रभाग क्र . ४ ब मधून माजी आमदार सुजितसिंह ठाकुर भाजपा यांचे चिरंजिव समरजित ठाकूर विरुद्ध माजी नगराध्यक्ष जाकिर भाई सौदागर यांचे चिरंजिव अजीम म जाकिर यांची लढत आहे . तसेच प्रभाग क्र . १० मध्ये माजी नगराध्यक्ष रमेशसिंह परदेशी व जाकिर भाई सौदागर यांचे चिरंजिव मोहसिन जाकिर यांच्यात लढत आहे . तसेच प्रभाग क्र . ३मध्ये माजी आमदार चंदनसिंह सद्दीवाल यांचे नातू माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल यांचे चिरंजिव मदनसिंह सद्दीवाल व एक सर्वसाधारण उमेदवार मदन दिक्षित यांच्यात लढत होणार आहे या तीन प्रभागात कोण बाजी मारेल त्या पार्टीचा नगराध्यक्ष होणार असे चित्र असल्याने ही निवडणूक फारच चुरशीची व अस्मितेची ठरणार आहे .