परंडा (प्रतिनिधी) परंडा येथील शासकीय ऑफिस महत्त्वाचा कणा समजला जाणारे तहसील कार्यालय परंडा हे होय. या ठिकाणी दररोज शेकडो नागरिकांची वर्दळ असते. विविध शासकीय कामानिमित्त ग्रामीण भागातील नागरिक दिवसभर तहसील कार्यालयामध्ये ताटकळत बसलेले असतात. परंतु या तहसील कार्यालयात मध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही, तो सध्या बंद अवस्थेत आहे. गेल्या तीन महिन्यापासून ही अवस्था आहे येथील कर्मचाऱ्यांना सुद्धा पिण्याच्या पाण्याची सोय नाही ! याचे तीव्र पडसाद संवाद चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. तहसील कार्यालयामध्ये विविध प्रमाणपत्र करिता दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रावर वेळेत सुनावणी होत नाही विविध दाखले प्रमाणपत्र वेळेत मिळत नाही.असे प्रकार सध्या तहसिलमध्ये घडत आहेत या प्रकारावर तहसील कार्यालयाचे तहसीलदार निलेश काकडे यांचे दुर्लक्ष आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.
तहसील कार्यालयामध्ये महसूल विभाग पुरवठा विभाग संजय गांधी विभाग या विभागामध्ये अनेक प्रकरणे नागरिकांची पेंडिंग आहेत. प्रकरणी सादर करून सहा महिने वर्ष झाले तरीदेखील याची सुनावणी झाली नाही. पुढील कार्यवाही करण्यात आले नाही. या गोष्टीची चर्चा नागरिकांमध्ये जोरदार रंगू लागले आहे. तहसील कार्यालयामध्ये विविध आस्थापनेमध्ये कार्य करणारे कर्मचारी सर्वसामान्य शेतकरी वर्गांना पुरेशी व नीट माहिती देत नाहीत.असा प्रकार सध्या जोरदार चालू आहे याला कारण म्हणजे तहसील कार्यालयाचे तहसीलदार यांचे कार्यालयावर नियंत्रण नाही, संजय गांधी विभागामध्ये सावळा गोंधळ पाहायला भेटतो यामध्ये अनेक महिने झाले याद्या नागरिकांच्या प्रसिद्ध नाहीत त्रुटीची पूर्तता दिली. तरी देखील पूर्ण नाही व बोगस प्रकार जोरदार चालू आहे. या गोष्टीकडे तहसीलदार निलेश काकडे यांनी त्वरित लक्ष घालून सर्वसामान्य जनतेचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे अशी मागणी शेतकरी वर्ग दिव्यांग नागरिक यांच्यामधून होत आहे.