साकत(बु) मध्यम प्रकल्पापासुन १ कि.मी.अंतरावरील पुरात वाहुन गेलेल्या गावडे पुलावरुन जीव धोक्यात घालुन ये- जा करावी लागते ; प्रशासनाचे दुर्लक्ष

परंडा,ता.५ (प्रतिनिधी) तालुक्यातील साकत (बु) मध्यम प्रकल्पावरील एक कि.मी.अंतरावर असणारा वीस ते पंचवीस गावांचा दैनंदिन मुख्य दळणवळण वापरातील गावडे पुलाची आलेल्या महापुरात एकबाजु वाहुन गेली आहे.पुल पुर्णपणे खचला आहे.या धोकेदायक झालेल्या पुलावरुनच जीव मुठीत घेऊन महिलांना,शालेय विद्यार्थ्यांना,नागरीकांना राञी-अपराञीही ये-जा करावी लागत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापही डोळेझाकच केल्याने गावखेड्यातुन मोठा संताप व्यक्त होत आहे.


मागील दहा दिवसापुर्वी साकत (बु)मध्यम तलाव,उल्का नदीला मोठा महापूर आला होता.या महापुराच्या पाण्यात पाचपिंपळा, कुंभेफळ हुन साकत,लाखी,अंतरगाव,वालवड,भुमकडे जाणाऱ्या मार्गावरील गावडे पुल ढासळुन दयनीय दुरावस्था झाली आहे.या धोकेदायक पुलावरुनच फक्त दुचाकी चालत नेण्याची कसरत करावी लागत आहे.महिलांना,शालेय मुलामुलींना ये-जा करावी लागत आहे.चारचाकी वाहनाची एस.टी ची वाहतुक बंदच पडली आहे.

याबाबत परंडा सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय कार्यकारीअभियंता ऐश्वर्या वडगावे व शाखा अभियंत्यांना परिसरातील ग्रामस्थांनी माहिती दिली आहे.परंतु अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्षच केल्याने नागरीक मोठा संताप व्यक्त करीत आहेत.आधीच या भागातील नागरीक महापुराने,अतिवृष्टीने ञासुन गेलेली आहेत.परिसरातील शेतकरी दररोज दुध घेऊन,शेतशिवारात जाण्यासाठी याच पुलाचा वापर करतात.लवकरच ऊसहंगाम सुरु होतोय.

परिसरातील भैरवनाथ कारखाना व बाणगंगा कारखान्यात याच गावडे पुलावरुन कायम ऊसवाहतुक होते.परंतु सध्या पुलच वाहुन दुरावस्था झाल्याने ऊसवाहतुकीच गंभीर प्रश्न उभा ठाकलाय.सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येवुन पुरबाधित पट्ट्यातील मुख्य रहदारीचा गावडे पुलाची डागडुजी करावी. वाहतुकीसाठी या गावडे पुलाचे काम तत्काळ करण्यात यावे अशी मागणी पुरबाधित नागरीक,परिसरातील शेतकरी करीत आहेत.

error: Content is protected !!