परंडा(तानाजी घोडके) भाजपाचे नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांनी श्री क्षेत्र भगवानबाबा दिंडीचे अतिशय सुंदर भक्तीमय वातावरणात परंडा येथे स्वागत केले. भगवान गड येथील श्री क्षेत्र भगवानबाबा दिंडीचे आगमन कल्याणसागर माध्यमिक विद्यालय, परंडा येथे मोठ्या उत्साहात दाखल झाली. भाजपा नेते माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांच्याकडून सर्व वारकरी यांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात केले होते. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच इतर मान्यवर व वारकरी, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते दि. १ जुलै
ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता आषाडी एकादशीच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील भगवान गड येथुन विठू माऊलीच्या भेटीसाठी पंढरपूर कडे निघालेल्या श्री क्षेत्र भगवान बाबा गड दिंडीचे कल्याणसागर माध्यमिक विद्यालय, परंडा येथे दि.१ जुलै मंगळवार रोजी सकाळी १० वाजता आगमण होताच दिंडीचे फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले.
यावेळी सर्वप्रथम ठाकूर व परिवाराकडून भगवान बाबा पालखीची आरती करून पूजा करण्यात आली. तसेच या शुभदिनी भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूर साहेब यांच्याकडून सर्व वारकरी यांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात केले होते. यावेळी शैला ठाकूर, प्रज्ञा कुलकर्णी, विकास कुलकर्णी, सुबोधसिंह ठाकुर, समरजित ठाकूर, उमेश गोरे, किरण गरड, चंद्रकांत पवार, मनोज ठाकूर, विठोबा म दने आदिसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच इतर मान्यवर व वारकरी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.