परंडा येथे १२ सप्टेंबर २०२५ रोजी दिव्यांग UDID प्रमाणपत्र तपासणी.

परंडा (प्रतिनिधी) परंडा तालुक्यातील दिव्यांग बांधव प्रमाणपत्र पासून वंचित राहू नये या हेतूने सतत पाठपुरावा करत दिव्यांग शिबिर तपासणीचे दर महिन्याला आयोजन करतात परंतु पहिल्या शुक्रवारी ईद ए मिलाद सुट्टी असल्याने तपासणी दुसऱ्या शुक्रवारी होणार आहे. त्या दृष्टिकोनातून दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेमध्ये दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन केले आहे. तरी परंडा तालुक्यातील जे दिव्यांग प्रमाणपत्र पासून वंचित आहेत किंवा ज्या दिव्यांगाच्या पगारी बंद आहेत अशा दिव्यांग बांधवांनी १२ सप्टेंबर २०२५ वार शुक्रवार रोजी आपले प्रमाणपत्र काढण्यासाठी ऑनलाईन पावती घेऊन उपस्थित राहावे असे आव्हान दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके यांनी दिव्यांग बांधवांना व दिव्यांग बांधवांचा सांभाळ करणाऱ्या सहकारी नागरिकांना  केले आहे. तरी तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी आधार कार्ड ऑनलाइन पावती फोटो व स्वतः दिव्यांग व्यक्ती यांनी समक्ष हजर राहावे.

Leave a Reply

error: Content is protected !!