समाज परिवर्तन महासंघाच्या नऊ वर्षाच्या लढ्याला अखेर यश

परंडा (माझं गांव माझं शहर)- समाज परिवर्तन महासंघाचे अध्यक्ष अजय पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप, महात्मा बसवेश्वर, राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि महात्मा फुले यांची स्मारके बार्शी नगरपालिकेच्या वतीने शहरात उभा करण्यात यावीत आशी मागणी केली होती.
या मागणीसाठी २०१६ रोजी बार्शी नगर परिषदेसमोर हलगी आंदोलन केले होते त्यापैकी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक जुना सरकारी दवाखाना या ठिकाणी उभा करण्यात आले परंतु उर्वरित महापुरुषांचे स्मारके उभी करण्यात आलेली नव्हती सततच्या अजय दिगंबर पवार यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर बार्शी नगर परिषदेने प्रशासकीय ठराव क्रमांक १४० दि. ३१ / ७ / २० २५ रोजी महाराणा प्रताप, महात्मा बसवेश्वर, महात्मा फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची स्मारके पुतळे पार्क अथवा संकेश्वर उद्यान या ठिकाणी पुतळे बसविण्याबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक स्मारक ३१०२/८८४/प्र.क्र. १२२/२००२/२९ दिनांक २ फेब्रुवारी २००५ आणि पुतळे धोरण राष्ट्रपुरुष / थोर व्यक्ती यांचे पुतळा उभारण्यास परवानगी देण्यासाठी मार्गदर्शन तत्त्वे विहित केलेला शासन निर्णय क्रमांक पुतळा- ३११६ / प्र. क्रमांक ३०८ / २९ दिनांक २ मे २०१७ मध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व अटींची पूर्तता करून पुतळे निर्माण करण्याबाबत च्या ठरावास व खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.
ही स्मारके तातडीने मंजूर व्हावी म्हणून संघटनेकडून विविध समाजांचा व संघटनांचा पाठिंबा घेण्यात आलेला होता बार्शी ख्रिश्चन समाज, लहुजी शक्ती सेना, जिव्हाळा मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था, वडार समाज,धनगर समाज, लिंगायत समाज, घिसाडी समाज, माळी समाज, राजपूत समाज या सर्वांचे व बार्शी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण तसेच अभियंता देशमुख साहेब यांचे समाज परिवर्तन महासंघाचे अध्यक्ष अजय पवार यांनी मानले आसून आता तातडीने महापुरुषांचे पुतळे उभारण्याचे काम पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!