कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेलचे माजी विद्यार्थी इंजिनिअर हेमराज कोरे यांची विदेशात गगनभरारी!

धुळे(माझं गांव माझं शहर)कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथील माजी विद्यार्थी इंजिनिअर हेमराज कोरे यांची दक्षिण अफ्रिका जोहान्सबर्ग येथे गोल्डन हिरा गृपमधील गायत्री कंपनीज तर्फे बॅक ॲन्ड स्पेशालिस्ट साठी निवड झाली. आता विदेशात रवाना होत आहेत. सध्या ते कॉनपॅड कंपनी औरंगाबाद येथे कार्यरत होते. याआधी बॉश कंपनी राजगुरू नगर, पुणे व भारत फोर्स बारामती या कंपनीत आपली सेवा बजावून आपल्या उत्कृष्ट कार्य कौशल्यातून अनुभवाच्या जोरावर एक एक पाऊल यशाच्या मार्गावर यशस्वी होत थेट विदेशात गगनभरारी घेत आहेत. शालेय जीवनात अत्यंत खडतर परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून डिप्लोमा इन मॅकॅनिकल पूर्ण करताच सेवेसाठी रुजू झाले. ब्राम्हणवेल येथील समाजसेवक कै. भिला दगा कोरे यांचे नातू, सामाजिक कार्यकर्ते श्री. कैलास भिला कोरे यांचे चिरंजीव आहेत. श्री. हिरालाल भिला कोरे, श्री. रविंद्र भिला कोरे यांचे पुतणे आहेत. आजही या एकत्रित कुटुंबातील सर्व सदस्यांचे सुसंस्कार ब्राम्हणवेल गावात आदर्श मानले जातात. वेल्डिंग वर्कर्स असलेल्या या कुटुंबातील सर्व भावंडांची मुले मॅकॅनिकल इंजिनिअर असून आपापल्या क्षेत्रात करिअर करून यशस्वी झाले आहेत. यामुळे हे कुटुंब एकमेकांचा आदर्श घेऊन नावारूपाला आले आहेत. अशातच इंजिनिअर हेमराज कोरे यांनी आता थेट विदेशात भरारी घेतल्यामुळे ब्राम्हणवेल गावाच्या सरपंचा सौ. रेखा देसाई, उपसरपंच श्री. कैलास भिका महाजन, सर्व ग्रामपंचायत सदस्य व पंचक्रोशीतील सर्व गावांमधील सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले. शालेय अभिमानाची बाब म्हणून कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल चे अध्यक्ष मा. नानासाहेब तुकाराम बळीराम माळी, उपाध्यक्षा, मा. सौ. हौसाताई तुकाराम माळी, सचिव मा. आप्पासाहेब एकनाथ बळीराम महाजन, सौ. सरलाताई एकनाथ महाजन, मुख्याध्यापक मा. माळी बी. एन., विज्ञान शिक्षक श्री. माळी के. एन., कलाशिक्षक श्री. हिरामण सोनवणे, क्रीडा शिक्षक श्री. निकुंभ बी. एस., युवा प्रशिक्षित शिक्षक श्री. प्रमोद महाजन, गणित शिक्षक श्री. रविंद्र सुर्यवंशी, लिपिक श्री. चेतन महाजन, शिपाई श्री. पंडित खैरनार, श्री. सुनिल ठाकरे यांनी आपला माजी विद्यार्थी इंजिनिअर हेमराज कोरे यांना व पालकांना विद्यालयात निमंत्रित करून शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. विशेष बाब म्हणजे इंजिनिअर हेमराज कोरे व त्यांची सर्व भावंडे व बहिणी यांनी आपल्या विद्यालयात शालेय शिक्षण पूर्ण केले असल्याचा अभिमान तर आहेच परंतु आपल्या ब्राम्हणवेल सारख्या छोट्याशा खेड्यातून एक पहिला माजी विद्यार्थी थेट विदेशात भरारी मारत आहे हा सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा ऐतिहासिक क्षण आहे! असे गौरवोद्गार संस्थेचे सचिव मा. आप्पासाहेब एकनाथ बळीराम महाजन यांनी व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारींनी व्यक्त केले. इंजिनिअर हेमराज कोरे यांनी शाळेने केलेल्या कौतुकामुळे व या शाळेतील सर्व शिक्षकांनी मला प्रामाणिकपणे घडविले आहे म्हणूनच मी आतापर्यंत एवढी मजल मी मारु शकलो असे अभिमानाने सर्व उपस्थित मान्यवर,विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षकांसमोर आपले आभारपर मत व्यक्त केले! या शाळेत माझे शालेय जीवन उन्नत झाले आहे मला सतत प्रेरणा मिळाली आहे म्हणून मी शाळेसाठी उपयोगी साहित्य म्हणून एक कपाट भेट देईन असे आश्वासन दिले. तेव्हा सर्व मान्यवर व विद्यार्थ्यांनी हेमराज कोरे यांचे टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत केले. या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करून तोंड गोड करण्यात आले. या कार्यक्रमाचे बहारदार व प्रेरणादायी सुत्रसंचलन श्री. निकुंभ बी. एस. यांनी केले. तर हृदयस्पर्शी आभार प्रदर्शन श्री. हिरामण सोनवणे यांनी केले.

Leave a Reply

error: Content is protected !!