परंडा(माझं गांव माझं शहर) शहरातील मानाचा गणपती असलेल्या हंसराज गणेश मंडळाची स्थापना सन १९६६ साली हिंदु मुस्लीम तरुणानी जातीय सलोखा कायम रहावा यासाठी एकत्रितपणे येऊन गणेश मंडळाची स्थापना केली.गणेश मंडळाने गणेशोत्सव कालावधीत विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती केली.मंडळाचा वसा पुढे चालु ठेवण्यात आला त्यासाठी तरुणानी पुढाकार घेऊन मंडळाच्या कार्यकारीनी मध्ये उपाध्यक्ष तसेच सदस्य पदी मुस्लीम समाजातील तरुणांना संधी देण्यात आली होती त्यामुळे सामाजिक सलोखा अबाधीत राहण्यासाठी मोठी मदत झाली.
गणेशोत्सव काळात होणाऱ्या सर्व धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात मुस्लीम समाजातील तरुण सहभागी होऊन पुढाकार घेत आहे सन २०१५ पासुन गणेश मंडळ वृक्षारोपन,स्त्रीभ्रुण हत्या रोखण्यासाठी जनजागृती रॕली तसेच चित्रफीत द्वारे जनजागृती करण्यात आली. मंडळाने केलेल्या कामाची दखल शासनाने घेतली.विसर्जन मिरवणूकी मध्ये ध्वनीप्रदुषन तसेच गुलाला ऐवजी फुलांच्या पाकळ्याची उधळन करण्यात आली व पारंपारिक वाद्याच्या गजरात शांततेत मिरवणुक काढण्यात येते.
सन २०१७ मध्ये हंजराज गणेश मंडळाने शनिवारवाड्याची प्रतिकृती साकारली तसेच स्त्री भ्रुण हत्या मुलगी वाचवा, जल पुर्नभरन पाणी वाचवा, स्वच्छता अभियान,शैक्षणिक संदेश,योगाचे महत्व,वृक्ष लागवडीचे महत्व आदी संदेश भित्ती पत्रकाद्वारे देण्यात आला.सर्व रोग निदान शिबीर, निबंध व चित्रकला स्पर्धा, सामाजिक प्रबोधन व्यसनमुक्ती, डाल्बी व गुलाल मुक्त पारंपारीक वाद्यात शोभा यात्रा काढली.मंडळाच्या वतीने विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.”श्री” ची आरती विविध राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, पत्रकार क्षेत्रात काम करत असलेल्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात येते.
शनिवारी (दि. ३०) रोजी पत्रकारांच्या हस्ते आरती करण्यात आली व सर्व पत्रकारांचे मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले तसेच समर्थ कुलधर्मे महाराष्ट्र राज्य प्राध्यापक पात्रता सीईटी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल पताकारांच्या व गणेश मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी आनंद खर्डेकर, विजय माने, प्रकाश काशीद, गणेश राशीनकर, गोरख देशमाने, आशुतोष बनसोडे, प्रशांत मिश्रा, प्रमोद वेदपाठक, तानाजी घोडके, शहाजी कोकाटे मंडळाचे अध्यक्ष- अमोल जोशी, उपाध्यक्ष वैभव कुळधर्मे, मार्गदर्शक नितीन भोत्रेकर, माजी नगरसेवक मकरंद जोशी, डॉ.प्रशांत गोफणे, अॅड श्रीकांत भालेराव, हरिभाऊ जोशी, राहुल देवळे, जयंत भातलवंडे, सुमित भातलवंडे, राहुल मुगळीकर, भगवान शहाणे, संदीप महामुनी, अमित लोखंडे, अमोल जोशी, शंतनू भातलावंडे, शिवम भातलवंडे, नील भोत्रेकर, रितेश गोफणे, आदर्श लोखंडे, आदी उपस्थित होते.