परंडा(प्रतिनिधी) मागील अनेक वर्षांपासून समाजातील घडामोडी, जनहिताचे प्रश्न आणि शासनाच्या योजनांची माहिती प्रामाणिकपणे जनतेपर्यंत आम्ही पोहोचवत आहे.परंतु अलीकडील काळात आमच्यावर अन्याय, दडपशाही व खोट्या आरोपांचा प्रयत्न करण्यात येत आहे.
काही दिवसापूर्वी अवैध धंदे बाबत भूम येथील पत्रकार चंद्रमणी गायकवाड यांनी स्थानिक पोलिसांना प्रश्न केला तेंव्हा तुम्ही शासकीय कामात अडथळा निर्माण करता का म्हणत एनसी दाखल करून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.तसेच त्यांना एफआयआर प्रत देण्यास नकार देण्यात आला. तसेच तुळजापूर येथील आनंद कंदले यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही बघून घेऊ म्हणत पोलीस तक्रार करण्यात आली आहे.
पत्रकारांवर खोटे गुन्हे नोंद करणे, त्यांच्यावर हल्ला, जीवितास धोका निर्माण झाल्यास संबंधितांना जबाबदार धरावे कारण आनंद कंदले यांनी पोलिस अधीक्षक यांच्या समोरच म्हटले की कार्यकर्त्याचा प्रशोभ झाला असून अनुचित प्रकार होईल.तेंव्हा अशा दबावात पत्रकार बातमीदारी कशी करणार ? पत्रकारितेला लोकशाहीतील चौथा स्तंभ मानले जाते. सत्य वार्तांकन करणे हा आमचा घटनात्मक अधिकार आहे. परंतु अशा प्रकारच्या अन्यायामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो तसेच लोकशाही धोक्यात येते.
त्यामुळे आम्ही आमच्या मागण्या पुढीलप्रमाणे करत आहोत.
1) पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय, धमक्या किंवा खोट्या गुन्ह्यांची तात्काळ चौकशी करावी.
2) दोषींवर कायदेशीर कारवाई करून पत्रकारांना न्याय द्यावा.
3) वार्तांकन करताना पत्रकारांच्या सुरक्षेची हमी द्यावी.
4) पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी.
यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद तालुका अध्यक्ष मुजिब काझी तालुका कार्याध्यक्ष प्रमोद वेदपाठक तालुका सचिव तानाजी घोडके सदस्य फारूक शेख श्रीराम विद्वत संतोष शिंदे रावसाहेब गायकवाड राहुल बनसोडे आधी सह पत्रकार उपस्थित होते.