महात्मा गांधी विद्यालय बॅडमिंटन स्पर्धेत व बुद्धिबळ स्पर्धेत तालुक्यात अव्वल .

परंडा (माझं गांव माझं शहर) परंडा येथे दि. २२ रोजी झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 14 वर्ष वयोगटामधून विद्यालयातील अर्जुन विजय पाटील हा विद्यार्थी तालुक्यामध्ये प्रथम आलेला असून त्याची जिल्हास्तरासाठी निवड झालेली आहे. व सतरा वर्ष वयोगटातून संस्कार तानाजी खोत हा विद्यार्थी तालुक्यामधून चौथा क्रमांक पटकावलेला आहे.
त्याचबरोबर दि.२३ रोजी झालेल्या तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाचा 14 वर्षे वयोगटातील मुलांचा संघ तालुक्यात प्रथम आला असून या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी मोठ्या थाटात निवड झाली आहे. स्पर्धेमधील सहभागी विद्यार्थी सिद्धार्थ रामगुडे, साईराज गवारे, संस्कार नलवडे, श्रेयश काळे, सार्थक मोमले हे असून विद्यालयाचा 17 वर्ष वयोगटातील मुलांचा संघ तालुक्यात द्वितीय आला आहे.
स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी ऋग्वेद बारस्कर, सोहम कांबळे, सुमित हजारे, रामा जोगदंड आणि संस्कार खोत हे आहेत.
बॅडमिंटन स्पर्धेचे तालुकास्तरीय आयोजन महात्मा गांधी विद्यालय परंडा या विद्यालयाने लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे सभागृह परंडा येथे केले होते. या यशाबद्दल सर्व विजयी खेळाडूंचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री रणजीत घाडगे, पर्यवेक्षक श्री काशीद सर यांनी अभिनंदन करून त्यांना जिल्हास्तरासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी क्रीडा प्रशिक्षक श्री सूर्यवंशी सर, श्री डोंबाळे सर, श्री नलवडे सर व कोच श्री शेळके सर , सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!