पुणे (माझं गांव माझं शहर) स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अमोसॉफ्ट टेककवर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड या सॉफ्टवेअर कंपनीने नॅशनल लेवल प्रेसेंटेशन प्रोग्राम चे आयोजन केले होते. या मध्ये धाराशिव व सोलापूर येथील इंद्रा पोलिटेक्निक इंजिनीरिंग विद्यार्थी व विध्यार्थिनींनी सहभाग नोंदवीला होता. याचा बक्षीस वितरण सोहळा 23 ऑगस्ट रोजी पुणे येथील पवना लेक, लोणावळा येथे संपन्न करण्यात आले. या सादरीकरणाचा उपयोग जागतिक माहीती व तंत्रज्ञान क्षेत्रात येणारे AI आर्टिफिसिअल इंट्यालीजंट नवनवीन बदल या सर्व गोष्टीना सामोरे जाण्याचे सामर्थ्य ग्रामीण भागामध्ये यावे यासाठी आयोजन केले होते.
यामध्ये प्रथम क्रमांक राधिका शेंडे, द्वितीय क्रमांक ज्ञानेश्वरी पाटील तसेच विभागून दुसरा क्रमांक समर्थ ढेगळे, तुतीय क्रमांक धनश्री कांबळे व कंपनी कडून सहभागी विद्यार्थिनी दीपाली सुतार, समृद्धी गरड, माहेश्वरी सोनवणेव निकिता पवार या विद्यार्थ्यांना स्कॉलनशिप च्या माध्यमातून सर्टफिकेशन मध्ये घेण्यात आले त्याचप्रमाणे अमृता शेटे,प्राप्ती बोधले, दिव्या खुणे, प्रतिभा माळी, मेहक मुलानी, हिंदुजा बाराते,वैष्णवी गायकवाड, सिद्धी मिरगणे,सानिका गलीटकर, तुप्ती वीर, दर्शन कोलगे, अनिकेत घोडे, गणेश ढेगळे या सर्वांचा सन्मान पुणे येथील पवना लेक, लोणावळा येथे करण्यात आला
या वेळी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर मेघा व्हनकळस, महाराष्ट्र तांत्रिज प्रशिक्षक अमोल व्हनकळस यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला उपस्थित पवना लेक चे कर्मचारी, विविध जिल्हातुन उपस्थित पर्यटक होते सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.