काळानुरुप बळीराजाच्या गोठ्याचे वैभव हरवत चालले : प्रकाश काशीद

परंडा ,ता.२२ (तानाजी घोडके ) सध्या राज्यभर सर्वदुर मोठा पाऊसाने हाहाकार उडाला आहे.अतिवृष्टीने जैमात आलेले खरीपाच्या पीकांचे मोठे नुकसान झाल्याचे चिञ दिसुन येत आहे.शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.यंदाच्या खरीप हंगामातील उडीद,मुग काढणीच्या कामास सुरुवात केली आहे.परंतु पावसाने पीकांच्या उत्पादनात मोठी घट होतानाचे चिञ दिसत आहे.शेतीचे गणित बिघडले आहे.बदलेल्या परिस्थितीचा संकटाचा सामना करावा लागत आहे.शेतीचे कामे आधुनिक ट्रॅक्टर व नवनवीन यांञिक पध्दतीने शेती करण्यात येत असल्याने बैलांचे महत्व कमी होत आहे.ग्रामीण भागात गावरान बैले व जानावरांचे गोठे हरवत चालले आहे.बैलपोळा हा सण शेतकरी कुंटुबात आनंदसोहळा मानला जातो.माञ,अनेक शेतकरी कुंटुबावर बैलाअभावी हा सण साजरा करण्याची वेळ आली आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीव्यवसाय अडचणीचा होवु लागला आहे.उत्पन्नापेक्षा मजुरांचे दर,खते,बियाणे यांचे भाव दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत.पुर्वी ग्रामीण भागात प्रत्येक शेतकऱ्यांकडे एक तरी बैलजोडी,गाय असायची परंतु यांञिक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने आजमितीस शेतकऱ्यांच्या गोठ्यातील बैलांची संख्या घटली आहे.बैल व इतर पशुधनाची संख्या घटलेली असताना बैलजोडीला शेतकरी कुंटुबांत अनन्यसाधारण महत्व असल्याने पोळा सण उत्साहात साजरा केला जातो.शुक्रवारी ता.२२ रोजी बैलपोळा सण सर्वञ साजरा होत आहे.पोळ्याच्या अदल्यादिवशी बैलांची लोणी व हळद लावुन खांदामळणी करण्यात येते.पोळ्यादिवशी बैलांच्या अंगावर झुल टाकुन,मोठी सजावट करुन सवाद्य मिरवणुक काढली जाते.पुरणपोळीचा नैवेद्य बैलांना दिला जातो. बैलपोळा सण शेतकरी कुंटुबात उत्साहात साजरा होतो.
पहाट झाल्यापासुन गोठ्यातील कामे करीत शेतकरी आपल्या बैलासह शेतीच्या कामात मग्न असतो.पुर्वी बैलांच्या गळ्यातील घुंघराच्या चंगाळ्याच्या आवाजावर गाण्याचा शिवारात शेतकरी सुर धरायचा.वाढत्या यांञिक शेतीमुळे हा सुरच लोप पावत चालला आहे.बैल जोपासण्याच्या पारांपारिक पध्दतीत काळानुरुप बदल होत गेला.अलीकडे गावरान बैले,पशुधन पाळण्याकडे शेतकऱ्यांचा कल कमी झालेला आहे.दुध हाच व्यवसाय शेतकऱ्यांनी नजरेसमोर ठेवल्याने जर्सी संकरीत गायी पाळण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढल्याचे दिसुन येते.जमीन नांगरणीपासुन बैलगाडी ओढण्यापर्यंत प्रत्येक कामासाठी बैल उपयोगी पडतो.बैलांच्या कष्टावरच शेतकऱ्यांचा अर्थिक कणा चालतो.आधुनिक काळात शेती कामासाठी ट्रॅक्टर,पॉवर टेलर ही अत्याधुनिक यंञे आल्याने बैलांचे कामही ठरावीक झाले आहे.शेतातील झटपट कामे करण्याकडे शेतकरी वळल्याचे दिसुन येते.खरीप व रब्बी पीके घेण्याऐवजी ऊस उत्पादकांकडे शेतकरी वळले आहेत.बैलांची व जनावरांची संख्या घटल्यामुळे शेतकऱ्यांस शेणखत मिळानासे झाले आहे.प्रत्येक गावात बैलांची संख्या कमी होत आहे.बैलांमुळे शेतकऱ्यांच्या गोठ्यास वैभव होते.माञ काळानुरुप बळीराजाच्या गोठ्याचे वैभव हरवत चालले आहे.अनेक वर्षापासुन बैलपोळ्याचे महत्व असुन बैलांना पुरणपोळी चारुन मोठी मिरवणुक काढतात.घरातील नवविवाहिता औक्षण करुन पुजा करायची.आता हे चिञ बदलत चालले आहे.पोळासणाचे महत्व कमी होत आहे.पुर्वी एकञ कुंटुबपध्दतीत चार ते पाच बैलजोड्या,गावरान गाया असायच्या परंतु विभक्त कुंटुबपध्दतीमुळे जमिनीच्या वाटाघाटीवरुन अल्पशा जमिनी येत गेल्या.त्यामुळे बैलजोडी सांभाळणे कठीण झाले.गोठाही संपत चालला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!