बावची विद्यालयाचा तेजस मोरे ठरला वेटलिफ्टिंग मध्ये जिल्ह्यात अव्वल

परंडा(माझं गांव माझं शहर) क्रीडा व युवा सेवा संचालनालय पुणे महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद क्रीडा धाराशिव व जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा २०२५ -२६  या दि २१ रोजी श्री व्यंकटेश महाजन महाविद्यालय धाराशिव या ठिकाणी पार पडल्या. शालेय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ यामध्ये जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा २०२५-२६ यामध्ये बावची विद्यालय परंडा येथील १७ वर्ष वयोगटामधून ५५ किलो वजनी गटामध्ये तेजस कैलास मोरे या खेळाडूने धाराशिव जिल्ह्यामधून प्रथम क्रमांक त्यांने मिळवला.लातूर विभागीय स्पर्धेसाठी त्याची निवड झालेली आहे.
तेजस कैलास मोरे या खेळाडूचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बिभिषण रोडगे सर तसेच बावची विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नारायण खैरे सर, इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तेजसला श्री रामेश्वर चोबे व काजी सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

error: Content is protected !!