परंडा:-शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील शिवमंदीरतील याञेनिमित्त शिवमुर्तीची भव्य मिरवणुक

परंडा (तानाजी घोडके) शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील शिवमंदिरात श्रावणमासानिमित्त सोमवार ता.१८ रोजी याञाउत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याञेनिमित्त शिवमुर्तीची ढोल-ताशा,टाळ मृदंग,हलगीच्या कडकडाटात भव्य मिरवणुक काढण्यात आली होती. शिवमंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती .
सालाबादप्रमाणे यंदाही श्रावणमासानिमित्त भुईकोट किल्ल्यातील शिवमंदिरात शिवमंदीर सेवा मंडळाच्यावतीने रविवारी ता.१७ व सोमवार ता.१८ रोजी विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आला.हरिजागर,किर्तन,प्रवचन कार्यक्रम झाले.सोमवारी सकाळी सहा वाजता,श्रीं च्या मुर्तीस महाभिषेक करण्यात आला.मागील दोन दिवसापासुन पावसाची संततधार सुरु आहे.सोमवारी सकाळपासुन पाऊसाची रिमझिम सुरुच होती.सकाळी १०ते ११ वाजता किर्तनकार बालाजी बोराडे यांचा किर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला.रिमझीम पावसातच दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत सुशोभित केलेल्या टॕक्टरट्राॕलीतुन,शिवमुर्तीची वाजत-गाजत ,मोठी आतिषबाजी करीत शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणुक काढण्यात आली होती. वारकरी संप्रदायातील टाळमृंदगाचा गजर,पारंपारिक सनईचौघाडा वाद्य लक्षवेधी होते. मिरवणूक विसर्जनानंतर महाआरती होवुन भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.याञेनिमित्त शिवमंदिरात भव्य मंडप उभारण्यात आला होता.मंदीर परिसरात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती.रिमझिम पावसातही दर्शनासाठी ग्रामीण व शहरातील भाविकांनी,महिलांनी मोठी गर्दी केली होती.नगरपालिका प्रशासनाने मंदीर परिसर मार्गावरील झाडेझुडपे काढुन स्वच्छता मोहीम केली आहे. याञाउत्सवासाठी शिवभक्त मंदीर पुजारी राजाभाऊ गिराम,दगडु जाधव,कल्याण,अंकुश माने,दत्ताञय मेहेर,दत्तामहाराज रणभोर, रणजीत रोहिटे,धनाजी जाधव,महादेव माने,अतुल माने,ईश्वर जाधव,वसंत माने,बिभिषण माने,कुंदन जाधव,पोपट जाधव आदिसह शिवमंदिर सेवा मंडळाच्या तरुणांनी पुढाकार घेतला.

Leave a Reply

error: Content is protected !!