सुप्रसिद्ध विधिज्ञ् ऍड. सचिन झालटे यांना शाळेच्या माजी शिक्षकांच्या आठणींनी डोळ्यातील अश्रू अनावर…

बार्शी(माझं गांव माझं शहर) येथील सुलाखे प्रशालेचे माजी विद्यार्थी, विधी क्षेत्रामध्ये संपूर्ण राज्यभर आपल्या कार्यकर्तूवाच्या जोरावर नावलौकिक मिळविलेले, सुप्रसिद्ध वकील ऍड. सचिन झालटे याना शाळेत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून झेंडा वंदना साठी विशेष आमंत्रित करण्यात आले होते. विधी क्षेत्रातील उल्लेखनीय काम करून शाळेच्या नावलौकिकात भर घातल्याबद्दल त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी विद्यार्थ्याना संबोधित करताना मराठी शाळेत शिकले म्हणून न्यूनगंड न बाळगण्याचे आव्हान केले. देशाच्या काना कोपऱ्यात विविध क्षेत्रातील उच्च पदावर सुलाखे, मराठी शाळेची मुले पोचल्याच त्यांनी सांगितले.

देशातील विविध उच्च न्यायालयात युक्तिवाद करत असताना अस्खलित इंग्रजीत युक्तिवाद केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामध्ये शाळेतील हाडाचे इंग्लिश शिक्षक ह वा कुलकर्णी, पी व्हि कुलकर्णी, परितकर सर यांनी पाया भक्कम केल्याचे सांगितलं. इंग्रजीचे अवडंबर न माजवता मातृभाषेतून दिलेली शिकवण विद्यार्थ्याचा पाया भक्कम करते असे त्यांनी अधोरेखित केले.

या प्रसंगी आबा महाजन मन गोलीकर सु का पाटील सर यांनी शिक्षा दिली नसती तर आज मी वकील झालो नसतो हे ही आवर्जून सांगितलं. आणि शाळेतील रमण मंडळ ,टेक्निकल विभाग तसेच क्रीडा विभाग यांच्या आठवणीना उजाळा दिला. आज शाळेतील मुले महाराष्ट्राच्या क्रिकेट टीम मधे खेळत असली तरी त्याचा पाया मु मा देशमुख आणि बोंबलट सर यांनी घातल्याचे सांगितले. शाळे मधल्या गमतीजमती सांगितल्या आणि त्यांच्या काळातल्या शिक्षेचे प्रकार देखील सांगितले . कडक शिस्त प्रिय शिक्षकच देश घडवू शकतो शिक्षकाना विद्यार्थ्याना शिस्त लावताना त्याना माफक प्रमाणात शिक्षा देण्याचा अधिकार असलाच पाहिजे व आताचे कायदे चुकीचे असल्याचे मत त्यांनी मांडले. त्यामधे पालकांनी देखील शिक्षकांना तशी मुभा द्यायला पाहिजे अन्यथा येणारी पिढी शिस्तप्रिय होणार नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

त्यांच्या बॅच च्या मुलांच्या जडणघडणीत शाळेतील शिक्षकानचा सिंहाचा वाटा असल्याचे ते म्हणांले. विद्यार्थ्यांनी मोठं होऊन शाळेचा नवलौकिक करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थीना केले. हयात नसलेल्या शिक्षकांच्या आठवणीने त्यांचा कंठ दाटून आला होता.
या कार्यकमाला शाळेचे मुख्याधापक हिरोळीकर सर तसेच प्रमुख पाहुणे मा. माजी नायब तहसीलदार वायकुळे साहेब आणि शाळेतील शिक्षक वृंद पालक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणत उपस्थित होते. भर पावसात मुलांनी हजेरी लावली होती. प्रमुख पाहुण्याच्या हस्ते कदंब वृक्षाची रोपटी लावून वृक्षारोपण पण करण्यात आले.

भाषणाच्या शेवटी ऍड. झालटे म्हणांले की, सर्व महाराष्ट्रभर विधी व्याख्यान मालेच्या निमिताने त्यांचे सत्कार झाले पण आजचा शाळेतला सत्कार त्यांचासाठी अनमोल होता. याप्रसंगी त्यांनी शाळेला ५१ हजार रुपयांची देणगी देखील दिली.

Leave a Reply

error: Content is protected !!