अखिल भारतीय साहित्य परिषदेवर निवड झालेल्या पदाधिकारी यांचा सत्कार

परंडा दि १५(माझं गांव माझं शहर) : – श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ परंडा येथील संस्थापक अध्यक्ष गोरख मोरजकर व सचिव सौ . आशाताई मोरजकर यांनी जेष्ठ साहित्यिक तुकाराम गंगावणे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेवर मराठवाडा उपाध्यक्ष , परंडा तालुका अध्यक्ष शिवशाहीर शरद नवले व माढा तालूका अध्यक्ष संतोष चव्हाण यांची निवड झाल्याने त्यांचा शाल फेटा , व ग्रंथ देऊन सन्मान केला व मराठी साहित्य संस्कृती बद्दल चर्चा करण्यात आली . यावेळी फुले आंबेडकर विद्वत्त सभा महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉ . शहाजी चंदनशिवे , वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के व अनिल जानराव हजर होते . वरिल सर्व नवनियुक्त अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पदाधिकारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!