परंडा(माझं गांव माझं शहर )हर घर तिरंगा या अभियानांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवाळेनगर या ठिकाणी दिनांक 13, 14 व 15 ऑगस्ट या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण निवृत्त शिक्षक त्रिंबक शेवाळे पोलीस पाटील शितलताई शेवाळे , ,पत्रकार विजय शेवाळे, भीमराव वाणी ,बापूराव मगर ,यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे, संदेशे आते है या राष्ट्रभक्ती पर गीतावर सुंदर लेझीम बसवण्यात आले होते.त्याच बरोबर जिस देश मे गंगा रहता है! मेरा मुल्क मेरा देश या राष्ट्रभक्तीपर गीतावर विद्यार्थ्यांनी सुंदर असा कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमासाठी शेवाळेनगर वस्तीवरील बहुसंख्य महिला भगिनी पुरुष व आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन शिक्षिका रूपाली हजारे व भाग्यश्री देवकर यांनी केले प्रस्ताविक व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक अनिल गिरी यांनी केले.