परंडा (प्रतिनिधी) रॅंगिंग मुळे शाळा महाविद्यालयांमध्ये अनेक विद्यार्थ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे . त्यामुळे विद्यार्थ्यांनी रँगिंग करू नये व केल्यास रॅगिंग विरोधी कठोर कायदे अस्तित्वात असल्याने त्या विद्यार्थ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही .आपल्या आई-वडिलांनी खुप मोठी स्वप्ने पाहिलेली असल्याने विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे असे प्रतिपादन परांडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयांमध्ये आयोजित केलेल्या अँटी रँगिंग डे निमित्त विशेष व्याख्यान आयोजित केले होते त्या व्याख्यानामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले . विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परिपत्रकानुसार 12 जून हा अँटेना डे महाविद्यालयामध्ये साजरा करावा असे आदेश असल्याने त्या आदेशाचे पालन करत महाविद्यालयात रॅंगिंग संदर्भात व्याख्यानाचे आयोजन केले होते .
यावेळी ग्रंथालयाचे जनक डॉ एस आर रंगनाथन यांची 133 वी जयंती साजरी करण्यात आली . मान्यवरांच्या हस्ते डॉ एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख व ग्रंथालयातील कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले .याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने तर प्रमुख व्याख्याते म्हणून पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले व्यासपीठावर अँटी रँगिंग समितीचे चेअरमन डॉ शहाजी चंदनशिवे मराठी विभाग प्रमुख डॉ गजेंद्र रंदील ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे आदी उपस्थित होते . यावेळी कनिष्ठ वरिष्ठ भागातील विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी पोलीस निरीक्षक आसाम चोरमले यांनी रॅगिंग संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करून त्या संदर्भात विविध कलमे समजावून सांगितली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ शहाजी चंदनशिव यांनी केले प्रास्ताविक प्रा डॉ महेशकुमार माने यांनी केले तर प्रा किरण देशमुख यांनी आभार मानले .