परंडा(माझं गांव माझं शहर) भावना आणि संकल्प यांचे पवित्र नाव म्हणजे रक्षाबंधन. भारतीय संस्कृतीमध्ये विविध सणांना खूप महत्त्व आहे त्यातीलच एक बहिण भावाच्या अतूट प्रेमाचे प्रतीक म्हणजेच रक्षाबंधन. हा सण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवाळे नगर येथील सर्व लहान बहिणींनी आपल्या शाळेतील सर्व लहान भावंडांना राख्या बांधून बहीण भावाच्या नात्यातील आत्मविश्वास ,दृढता आणि संस्कृतीचे जतन कसे करावे या विषयी सविस्तर माहिती शाळेच्या शिक्षिका रूपाली हजारे यांनी सांगितली.प्रस्तावीक व आभार मुख्याध्यापक अनिल गिरी यांनी केले.