उपविभागीय अधिकारी तथा विभागीय दंडाधिकारी भूम या पदावर नवनियुक्त मा. डोंगरे (भा.प्र.से )यांनी घेतला चार्ज..!

भूम (प्रतिनिधी) भूम येथील उपविभागीय अधिकारी तथा विभागीय दंडाधिकारी वैशाली पाटील यांची बदली झाल्यामुळे या पदाचा चार्ज भूम येथील तहसीलदार यांच्याकडे सोपवण्यात आला होता. काही दिवस गेल्यानंतर या पदावर मा. डोंगरे यांची नियुक्ती झाली दि 8 ऑगस्ट 2025 रोजी पदभार स्वीकारला. भूम , परंडा , वाशी तालुक्यातील अनेक प्रश्न समस्या सोडवण्यासाठी कोणती रणनीती आखणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. तालुक्यात दिव्यांग, शेतकरी , निराधार यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या समस्या सोडवण्यासाठी कोणते पाऊल उचलणार हे याकडे लक्ष लागले आहे.यावेळी भूम येथील तहसीलदार जयवंत पाटील व इतर कर्मचारी यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.

Leave a Reply

error: Content is protected !!