आनाळा (माझं गांव माझं शहर) लोकशाहीर साहीत्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय उक्तृत्व स्पर्धेत लहाण गटात कु कल्याणी निशीकांत क्षिरसागर हिने तर मोठ्या गटात कु सृष्टी नागनाथ डबडे हिने प्रथम क्रमांक मिळविला. परंडा येथील सार्वजनिक जयंती समितीच्या वतीने साहीत्य रत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त दोन गटांमध्ये परंडा येथील पंचायत समितीच्या सभाग्रहामध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या .
या स्पर्धेत 150 शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेमध्ये लहाण गटात कु कल्याणी निशिकांत क्षिरसागर प्रथम, कु अनुष्का बाळासाहेब काळे द्वितीय, कु अर्जुन विजय पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला तर मोठ्या गटात कु सृष्टी नागनाथ डबडे प्रथम कु शिवानी राम जगताप द्वितीय, कु साक्षी सुरेंद्र भोजणे हिने तृतीय क्रमांक पटकावला परंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये झालेल्या जयंती कार्यक्रमाच्या प्रसंगी विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व ट्रॉफी प्रमाणपत्र देवुन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी जिजाऊ ब्रिग्रेडच्या प्रदेश सहसचिव सौ आशाताई मोरजकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब ढवळे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष गोरख मोरजकर, डॉ आनंद मोरे पत्रकार निशीकांत क्षिरसागर जयंती समितीचे नवनाथ कसबे, राहुल बनसोडे आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.