परंडा (प्रतिनिधी): आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनानिमित्त श्री सिद्धिविनायक सोशल फाउंडेशन व धाराशिव जिल्हा चेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत राजे शिवाजी पब्लिक स्कूल, परंडा येथील इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी सिद्धी महेश शिंदे हिने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
या यशाबद्दल विद्यालयात सिद्धीचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभात सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सिद्धीला पुष्पहार व सन्मानचिन्ह प्रदान करून तिचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी उपस्थित शिक्षकांनी सिद्धीच्या या यशाचे कौतुक करत बौद्धिक क्रीडांमध्ये विद्यार्थ्यांनीही आपली क्षमता सिद्ध करावी, असे मार्गदर्शन केले. शाळेच्या वतीने सिद्धीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.